मी बुडविले ९ हजार कोटी मात्र माझी १३ कोटींची संपत जप्त; विजय मल्ल्याचे सरकारवर आरोप

0

नवी दिल्ली-भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने भारतीय बँका मी ९ हजार कोटी बुडविल्याचे सांगत आहे मात्र प्रत्यक्षात माझी १३ हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मल्ल्याने ट्विट करत सरकारवरील रोष व्यक्त केला. कायदेशीर शुल्काच्या रूपात संपत्तीच्या होत असलेल्या बेसुमार वापरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

मी रोज सकाळी उठल्यानंतर पाहतो तर कर्ज वसुली लवाद अधिकाऱ्यांनी माझी आणखी एक संपत्ती जप्त केलेली असते. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य १३ हजार कोटी रूपयांहून अधिक आहे. बँकांनी दावा केला आहे की, सर्व प्रकारचे व्याज मिळून त्यांचे ९ हजार कोटी रूपये थकबाकी आहेत. याचे आता समीक्षण केले जावे. हे आणखी कितीपर्यंत जाईल ? हे योग्य आहे का, असा सवाल करणारे ट्विट मल्ल्याने केले आहे.