नवी दिल्ली – कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत मद्यसम्राट विजय मल्ल्या याने उडी घेतली आहे. येत्या १२ मेला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा मल्ल्या याने व्यक्त केली आहे. मात्र, जामिनासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे लंडन सोडून जाणे शक्य नसल्याचे मल्ल्या याने म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रत्यार्पण संदर्भातील याचिकेवर लंडनच्या वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कर्नाटकच्या निवडणुकीविषयी मल्या याला छेडले. त्यावेळी राजकीय घडामोडींची माहिती ठेवत नसल्याने भाष्य करण्यास त्याने नकार दिला.