विश्वचषक स्पर्धेतून विजय शंकरची माघार; पायाला दुखापत

0

लंडन: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला काल रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या अपघातात प्रथमच पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात भारताची विजयी मालिका खंडित झाली. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाला दुखापत झाल्याने त्याने आहा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. सलामीवीर शिखर धवननंतर भारताला हा दुसरा मोठा धक्का आहे.

काल झालेल्या सामन्यात लोकेश राहुल पाठिवर पडला आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे राहुलला मैदानाबाहेर पाठवण्यात आले आहे. ही दुखापत जर फार गंभीर असेल तर त्याला या सामन्यात फलंदाजीही करता येणार नाही. जॉनी बेअरस्टोव हा 48 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी जॉनीने एक मोठा फटका लगावला. हा चेंडू षटकार जाणार की राहुल झेल पकडणार, याबाबत उत्सुकता होती. सीमारेषेवर राहुल झेल पकडायला गेला. पण त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही. तरीही राहुल झेल पकडायला गेला आणि सीमारेषेबाहेर पाठीवर पडला. त्यावेळी राहुलला दुखापत झाली.