चाळीसगाव। तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे गेल्या महिन्यापासून पाणी पुरवठा खंडित आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठा करावा, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाचा इशारा येथील ग्रामस्थ महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पिण्याचे पाणी हे 30 ते 35 दिवसात मिळते. कचरा गाडी येत नाही. गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. गल्लीतील हायमास्ट लाईट बंद आहे. तसेच गटारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वेळोवेळी लेखी तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून ही समस्या तातडीने सोडविण्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. त्यामुळे त्यांचा रोष मी समजू शकते. सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील, असे सरपंच कविता जाधव यांनी ‘जनशक्ती’जवळ बोलतांना सांगितले.