काश्मीरमधील हिंसाचारला पाकिस्तानकडून खतपाणी; राहुल गांधींचा पाकिस्तानवर हल्लाबोल !

0

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्याचे पाकिस्तानच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. पाकिस्तान दररोज नवनवीन वक्तव्य करत आहे. काश्मीरमध्ये अशांतत असल्याचा खोटा प्रचार पाकिस्तान करत आहे. दरम्यान आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. काश्मीरमध्ये जो हिंसाचार होत आहे, त्याला पाकिस्तानचे समर्थन मिळत, असल्याचे सांगत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्वीटरवरून राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

सरकारबरोबर आपण अनेक मुद्द्यांवर असहमत आहोत. परंतु काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, हे मी स्पष्ट करत आहे. या प्रकरणात पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशाने हस्तक्षेप करून नये, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमध्ये जो हिंसाचार परसत आहे, त्याला पाकिस्तानचे समर्थन मिळत आहे. संपूर्ण जगभरात दहशतवादाला पाकिस्तानने पोसले असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघांनाचीही काँग्रेसनेही जोरदार विरोध केला. तसेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, 15 ऑगस्टपासून पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. यामध्ये तीन जवानांना वीरमण प्राप्त झाले होते. तर एका सामान्य व्यक्तीलाही आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच चार जवान जखमीही झाले होते. दरम्यान, राजौरी आणि पुंछमध्ये पाकिस्तानकडून सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे चिंतेचा विषय आहे. गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेला गोळीबार हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या प्रदेश समितीची मुख्य प्रवक्त रविंद्र शर्मा यांनी दिली. तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तसेच घुसखोरीच्या घटनांनाही आळा घालण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.