‘विप्रो’चे अझीम प्रेमजी जुलैमध्ये होणार निवृत्त !

0

नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील दिग्गज आणि ‘विप्रो’चे संस्थापक अझीम प्रेमजी हे जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. कंपनीने आज गुरुवारी ६ रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी कंपनीची धुरा ५३ वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली. निवृत्तीनंतर ते नॉन-एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतील. अझीम यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्ष णि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेणार आहे. अब्दाली नीमुचवाला हे विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.