विराटवर शुभेच्छांचा वर्षाव !

0

विशाखापट्टणम-आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली आहे. विराटने १५७ धावांची खेळी करत भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला. तसेच या सामन्यात विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. घरच्या मैदानावर ४ हजार धावांचा टप्पा तर पार केलाच शिवाय १० हजार धावा देखील केल्या. याकामगिरीमुळे विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

२०५ सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पार करणारा एकमेव खेळाडू म्हणून कोहली याने नाव मिळविले आहे.