नवी दिल्ली- भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खूपच फॉममध्ये आहे. नवनवीन रेकोर्ड तो नावे करीत आहे. दरम्यान देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कार विराट कोहलीला देण्यात यावा अशी मागणी होत आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
भारतीय संघासाठी विराट कोहली चांगली कामगिरी करीत आहे. त्याने १८ हजार ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. ५० पेक्षा अधिक अवरेज त्याचा आहे. या आधी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे.