नवी दिल्ली-बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचा मुलगा निवान सध्या भलताच आनंदात आहे. विराट कोहलीने आपली हस्ताक्षर केलेली बॅट, निवानला भेट म्हणून दिली आहे. या दोघांमधील भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळालेल्या निवानला क्रिकेटमध्येही प्रचंड रस आहे. सध्या निवान माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. विराट कोहली हा निवानचा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. त्याच्या आवडीबद्दल विराटला एक दिवस माहिती देण्यात आली, यानंतर विराटने निवानची भेट घेऊन आपली हस्ताक्षर केलेली बॅट त्याला भेट म्हणून देत त्याच्यासोबत फोटोही काढला.