नवी दिल्ली : क्रिकेटच्या महाकुंभाला अर्थात विश्वचषकाला सुरुवात झालेली आहे. आज चौथा सामना होणार आहे. बुधवारी ५ रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान भारतासाठी काहीशी निराशाजनक बातमी समोर येत आहे. संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. Ageas Bowl रविवारी साऊथहँपटन येथे त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
कोहलीची ही दुखापत आणि अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पाहता हे चिंताजनक आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विराट विश्वचषकाच्या तयारीत व्यग्र होता. सरावापासून ते संघालाही या सामन्यांसाठी एकसंध ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या विराटला झालेली ही दुखापत क्रीडा रसिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण करुन गेली आहे.