उलट सुलट चर्चांमुळे नाराज- विराट कोहली

0

नवी दिल्ली-भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते गुप्तपणे त्यांनी केलेले लग्न यापर्यंत सगळ्या गोष्टीत चाहते चवीने लक्ष घालतात. पण चाहत्यांच्या याच चर्चांमुळे हल्ली विराट अस्वस्थ होतो. त्यानेच याबाबद्दल माहिती दिली आहे.

आम्हाला देखील खाजगी आयुष्य आहे

एका कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला की माझे चाहते माझ्याबद्दल कायम चर्चा करत असतात. चाहत्यांनी कायम माझ्या किंवा माझ्या जोडीदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे मी काही वेळा थोडा अस्वस्थ होतो. मी हळूहळू आता या गोष्टींना सरावायला लागलो आहे. मात्र सेलिब्रिटी हे देखील माणूसच असतात हे चाहत्यांनी समजून घ्यायला हवे.

खेळतांना फक्त टीमचा विचार

मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये समतोल राखतो. जेव्हा मी माझ्या कुटुंबाबरोबर असतो, तेव्हा मी माझ्या डोक्यातून क्रिकेटचा विषय पूर्णपणे बाजूला काढतो आणि मित्रांसोबत, कुटुंबासोबत छान वेळ घालवतो. मला माझ्या कुत्र्याबरोबर वेळ घालवायलाही आवडते. पण ज्यावेळी मी दौऱ्यावर असतो. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त खेळाचा विचार असतो, ज्यात नेहमीचे व्यायाम आणि कसरत करणे वगैरेचा समावेश असतो, असेही तो म्हणाला.