राजकोट –पदार्पणात ठोकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शतक ठोकणारे पृथ्वी शॉनंतर आज दुसऱ्या दिवशी विराट कोहली यांनी गाजविले आहे. विराटने आपले 24 वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकासोबतच विराटने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. तसेच अवघ्या 72 कसोटीत 24 शतके फटकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध आज फटकावलेले शतक हे विराटचे यंदाच्या वर्षातील हे चौथे कसोटी शतक ठरले आहे. तसेच तर कर्णधार म्हणून विराटने फटकावलेले 17वे कसोटी शतक ठरले आहे. त्याबरोबरच विराटने या खेळीदरम्यान घरच्या मैदानांवरील तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन करत शतकाला गवसणी घातली. विराटचे कसोटी क्रिकेटमधील 24 वे शतक होते. विशेष म्हणजे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणारा विराट हा चौथा फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत 51 शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या, 36 शतकांसह राहुल द्रविड दुसऱ्या, 34 शतकांसह सुनील गावसकर तिसऱ्य़ा स्थानावर आहेत.