विराटला ‘स्लो ओव्हर’ची शिक्षा; लाखोंचा दंड

0

नवी दिल्ली: आयपीएलचे तेरावे मोसम सध्या दुबईत सुरु आहे. चाहते आनंद लुटत आहेत. दरम्यान गुरुवारी २४ रोजी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने विजय मिळविला. या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी कामगिरी विराट कोहलीला करता आली नाही. त्यातच विराटला ‘स्लो ओव्हर’ची शिक्षा भोगावी लागली आहे. ‘स्लो ओव्हर’ ठेवल्याने विराट कोहलीला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात बेंगळूरुचा ९७ धावांनी मानहानीकारक पराभव झाला होता.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने षटकांची गती कमी राखून प्रथमच ‘आयपीएल’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार कोहली याला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात विराट एकाच धावावर बाद झाला, त्यानंतर दोन झेल देखील सोडले. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली.