गुवाहाटीः वेस्ट इंडिजविरुद्ध काल पहिल्या वन-डे सामना झाला त्यात भारताने दणदणीत खेळी करत विजय संपादन केले. कालच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने १४० धावांची दणदणीत खेळी करून क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना मागे टाकले. कालच्या सामन्यात केलेल्या खेळीमुळे विराटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तो स्वीकारताना कोहलीने केलेल्या एका विधानामुळे त्याच्या रिटायरमेंटची चर्चा सुरु झाली आहे.
क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही वर्षंच शिल्लक आहेत. देशासाठी खेळणं ही अत्युच्च सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा खेळ फार गंभीरपणे न घेणं तुम्हाला परवडू शकत नाही. तुम्ही खेळाबद्दल प्रामाणिक असले पाहिजे आणि मी तसेच राहण्याचा प्रयत्न करतो असे वक्तव्य केले. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.