मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्याकडे मतदान कार्ड नसल्याने तो मतदान करणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र विराट कोहलीने तातडीने मतदान कार्ड बनविले असून तो आता मतदान करणार आहे. विराटने आज याबाबत इंस्टग्राम स्टेटसवरून माहिती दिली आहे. ३० वर्षीय विराट कोहलीने यांनी मी १२ में रोजी गुरुग्रं येथे मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक विराट कोहलीची अनुष्का शर्मा सोबत मुंबईत मतदान करण्याची इच्छा होती. मात्र मुंबईत मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे मुंबईचे मतदान कार्ड नाही. त्यामुळे त्याला मुंबईतून मतदान करता येणार नाही. उद्या मुंबईत मतदान आहे. विहित मुदतीत कोहलीने अर्ज केले नाही त्यामुळे त्याला मुंबईत मतदान करता येणार नाही.
लोकसभा निवडणूक असल्याने क्रिकेटपटू व सेलिब्रिटी तसेच कलाविश्वातील व्यती पुढाकार घेत, मतदान करण्याचे आवाहन करत आहे. कोहली हा देशातील अनेकांचा आदर्श आहे. त्यामुळे त्याने मतदानाकडे पाठ फिरवली तर चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जाऊ शकतो.