बंगळूर: कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसची संयुक्त सरकार जाऊन आता भाजपची सत्ता आली आहे. कुमारस्वामी यांच्यानंतर आता बी.एस.येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान आज विधानसभेच्या अध्यक्षपदी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच त्यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.