विस्तारा विमान कंपनीच्या तिकीटात ७५ टक्के सूट

0

मुंबई : अवघ्या काही तासात मान्सूनचे आगमन होणार आहे. पावसाळा सुरू झाला की विकेंड पिकनीकचे बेत बनतात. अशात तुम्ही विकेंड पिकनीक प्लॅन करत असाल तर विमानदर स्वसत जहल्याने आता ही ट्रीप देशांतर्गत होऊ शकते.

गो एअर पाठोपाठ आता विस्तारा विमान कंपनीने देखील नवी ऑफर आणली आहे. त्यानुसार विमानप्रवासाचे दर ७५ टक्के कमी केले आहे. २१ जून ते २७ सप्टेंबर दरम्यान विमानप्रवासासाठी ही ऑफर खुली ठेवण्यात आली आहे. सामान्य विमानप्रवास दरांपेक्षा या विमानप्रवासाच्या तिकिटींची किंमत ७५ टक्के करण्यात आली आहे. गोएअरची नवी

असे असतील दर
शॉर्ट डिस्टंट विमानप्रवासाठी तिकीटाचे दर १५९९ इतके कमी आहेत. दिल्ली – लखनऊ -१५९९ रूपये, दिल्ली रांची -२१९९ ,दिल्ली – कोलकत्ता – २२९९ , दिल्ली मुंबई – २२९९, दिल्ली -गोवा २७९९, कोलकत्ता – पोर्टब्लेअर २४९९ असे असणार आहे.