नवी दिल्ली: गेले दोन महिने सुरू असलेली सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या १९ रोजी मतदान होणार आहे. देशभरातील ५९ जागांसाठी मतदान होणार असून भवितव्य मतपेठीत बंद होणार आहे.
10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि अधिसूचना जारी केली. गेले दोन महिने देशात प्रचारसभा, रोड शोंनी वातावरण ढवळून निघाले. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता ही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपली आहे.