मतदान हाच भारतीय लोकशाही बळकटीकरणाचा आत्मा – डॉ. संजय पाटील

जळगाव – पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे विद्यार्थी विकास विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय लोकशाही बळकटीकरणात मतदानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.डॉ. एम.के. वाघमोडे होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.संजय काशिनाथ पाटील हे लाभले. प्रा.डॉ.संजय पाटील यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही बळकटीकरणात मतदानाचे महत्व हे विशद करतांना संपूर्ण जगामध्ये लोकशाही कशी अस्तित्वात आली आणि बळकटीकरण करण्यासाठी भारताने कोणकोणत्या उपाय योजना केल्या आहेत, किंबहुना कराव्या लागतील,या संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच मतदानाचा अधिकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील यावेळी त्यांनी विशद केली. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढणे महत्त्वाचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एम.के. वाघमोडे यांनी सुद्धा राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान कसे आहेत हे विशद केले. व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मतदान यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील दादा सुरवाडे यांनी केले.तसेच कार्यक्रमाची प्रास्तविक प्रा. दिलीप भीमराव गिऱ्हे यांनी केली.तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. नंदिनी वाघ यांनी मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अजय देविदासराव पाटील यांनी परिश्रम घेतले केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते .