कर्नाटकात एका मजुराकडे आढळले व्हीव्हीपॅटचे कव्हर्स

0

बंगळूर-कर्नाटकातील सत्तेसाठीचा संघर्ष संपूर्ण देशभराने पाहिला. अत्यंत वेगवान घडामोडीनंतर कुमारस्वामी हे आता सत्ता स्थापन करणार आहेत. दरम्यान, निकालानंतर पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. याच घडामोडीत आता व्हीव्हीपॅटबाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील एका मजुराच्या घरात ८ व्हीव्हीपॅटचे कव्हर्स आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या कव्हर्सचा वापर हे मजूर कपडे ठेवण्यासाठी करत होते. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

मजुराच्या घरी सापडलेल्या मशीन नसून व्हीव्हीपॅटचे ते कव्हर असल्याचे पोलिसांनी म्हटले. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचेही ते म्हणाले. या व्हीव्हीपॅटला बॅटरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.