मुक्ताईनगर प्रतिनिधी…… तालुक्यातील मौजे वढवे गावी अनुसूचित जाती नवबौद्ध एस सी लोकांची संख्या असताना सुद्धा सन २०१२ पासून या ठिकाणी या ऐस.सी मागास प्रवर्गासाठी ग्राप सदस्य पदी उमेदवारीची जागा नसल्याने नागरिकांनी तहसीलदार मुक्ताईनगर यांची भेट घेऊन लेखी हरकत नोंदवली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,आज दिनांक २३ जून २०२३ रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्य जागांच्या वार्ड निहाय हरकती नोंदविण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वाढवे येथील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी मुक्ताईनगर चे निकेतन वाळे यांची भेट घेऊन त्यांना हरकती निवेदन दिले आहे. त्यात गावी सन २०१२ पर्यंत अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गासाठी सलग राखीव जागा येत असताना सन १२ पासून गावी अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी दाखवण्यात आली असल्याकारणाने येथे या प्रवर्गासाठी उमेदवारी नाही.तालुक्यात अनेक गावी एस.टी. प्रवर्गाचे नागरिक नसताना अशा गावीसुद्धा एस.टी. वर्गासाठी उमेदवारीच्या जागा ठेवण्यात येतात परंतु वढवे गावी अनुसूचित जाती वस्ती असताना सुद्धा येथे मागासवर्गीय नागरिकांना प्रतिनिधित्वाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी प्रशासन हेतूत: जातीवाद करते की काय ? अशी शंका निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे. तहसीलदार मुक्ताईनगर यांनी निवेदन स्वीकारून परिस्थितीची पडताळणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
आम्हाला उमेदवारीचे आरक्षण न मिळाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप लावून आंदोलन करू व होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही निवेदनकर्त्यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.यावेळी निवेदनावर अशोक विश्वनाथ, सावळे’ सुधाकर झनके,पंडित सावळे,प्रवीण धुंदे,रतिराम बोदडे,गोकुळ धुदे,आनंदा धुंदे, राजू सावळे,विनोद सावडे,ऊखरडू बोदडे,सुखदेव सावडे,निलेश बोदडे,सागर तायडे, सिद्धार्थ धुंदे, इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.