पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश ; मुख्य रस्त्यासाठीही 42 लाखांचा निधी
जळगाव :- वाघनगरसाठी जलस्वराज्य 2 अंतर्गत 19 कोटी पाणीपुरवठा योजना मंजूर असून 8 कोटीच्या कामांचाचे ठेकेदारामार्फत काम सुरू असून विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईन व वितरण नलिकेचे काम सुरू आहे. ठेकेदार व संंबंधित विभागाने डिसेंबर योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संत गाडगेबाबा चौक ते पलाडे शाळेसाठीच्या मुख्य रस्त्यासाठी 42 लाखांचा निधी मंजूर करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पुढील काम सुरु करण्याचेही आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. पाणी व रस्त्याच्या मुलभुत सुविधांमुळे वाघनगर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबद्दल नागरिकांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत.
अजिंठा विश्रामगृहाच्या सभागृहात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाघनगर व सावखेडा परिसरातील पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामांच्या आढावा बैठक शनिवारी पार पडली. वाघनगर परिसरात नवीन अंगणवाडी व जि प ची शाळा सुरु करण्यात येऊन डीपीडिसी मधून इमारत बांधकामा चा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांना देण्यात आल्या. तसेच ग्रा. प. च्या मागणीनुसार नवीन रेशनिग दुकान, नवीन मतदान बूथ, बी.एल. ओ .नेमणूक बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. 2 टँकर 2 दिवसात सुरू करण्याच्या सूचनाही तहसिलदार वैशाली हिंगे व गटविकास अधिकारी सोनवणे याना देण्यात आल्या.सदर परिसरात पोलीस विभागाने रात्रीची गस्त घालावी,कुंभारखोरी उद्यान मॉर्निग वॉक साठी खुले करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बीएसएनएल च्या आडमुठे धोरणामुळे योजनेकामी अडचणी ठरत असल्याचे का.अभियंता निकम व ठेकेदार यांनी सांगितले असता ना गुलाबराव पाटील हे आक्रमक होऊन बीएसएनएल ची दादागिरी खपवून घेऊ नका. बी.एस. एन. एल. व एम. जी.पी. ने समन्वयातून पाणीपुरवठा योजनचे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून योजना यशस्वी करावी असे सूचित केले
मुख्य रस्त्यांसाठी 42 लाखाचा निधी
गाडगेबाबा चौक ते पलोड शाळेपर्यंत च्या रस्त्यासाठी ना गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करून डीपीडिसी च्या गौण खनिज निधी अंतर्गत 82 लाखाचा रस्ता मंजूर केला असून 42 लाखाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या कामाला पुढील महिन्यात सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले. स्ट्रीट लाईटसाठी सर्वक्षण करून आमदार निधीतून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या – ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग ची कामे हाती घेण्याबाबत गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले. त्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले.
मंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरिकांकडून सत्कार
बैठकीला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, शाम कोगटा, पं स. सदस्य नंदलाल पाटील, उपसरपंच आबा सोनवणे, ग्रामसेविका अनिता सपकाळे, शोभाताई चौधरी, सरिता माळी, मंगला बारी, अर्चना खर्चाने, चेतन तायडे, गणेश ठाकूर , सचिन बाविस्कर, अशोक तायडे, धांडे, रविंद्र राव गजानन हिवरे, प्रशांत भालशकर जयेश जाधव , सर्व शाखा अभियंता, अधिकार्यांसह वाघनगर व सावखेडा परिसरातील ग्रामस्थ उपस्थिती होती. समस्या मार्गी लावल्याबद्दल यावेळी नागरिकांनी मंत्री पाटील यांचा सत्कार करुन आभार मानले.