जळगाव – वामनदादा त्यांच्या 57 वर्षांच्या राजकीय कारर्कीदीत कधीही प्रलोभनांना बळी पडले नसून ते भ्रष्टाचाराचा डाग नसलेली व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी काढले. ते महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते वामनदादा खडके यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित गौरव कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी खासदार ए. टी. पाटील, कुटुंबप्रमुख रमेशदादा विठु पाटील, खासदार रक्षाताई खडके, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, माजी खासदार प्रमोद सरोदे, माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, शिक्षणसमिती सभापती पोपट भोळे, अॅड. केतन ढाके, पिपल्स बँक चेअरमन भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
महापौरांची बढती देण्याची शिफारस
महापौर नितीन लढ्ढा यांनी वामनदादांनी पन्नासवर्षांपासून जास्त काळ राजकाराणाला दिला असून पक्षाने त्यांना महापालिका क्षेत्रातून प्रमोशन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी वामनदादांना काँगे्रसपासून सुरूवात केली असल्याने दादांनी पुन्हा स्वगृही परतावे कारण भारतीजनता पार्टीत वयाच्या 70 नंतर बढती नसल्याचा टोला लगवाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दादांच्या 50 वर्षांच्या राजकारणातील योगदानाबद्दल गौरउद्गार काढलेत. यावेळी खासदार ए. टी. पाटील, कुटूंबनायक रमेशदादा विठु पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील वामनदादा खडके यांची वही तुला करण्यात आली.
57 वर्षांपासून निवडून येण्याची मोठी उपलब्धी
खडके यांनी वामनदादांचा गौरव करतांना पुढे सांगितले की, वामनदादांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात जनरल सेेक्रेटरीची निवडणूक लढवून जिंकली तेव्हापासून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले. वयाच्या 26व्य वर्षी नगरसेवक तथा तरूण नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते 57 वर्षांपासून राजकारात असून सातत्याने निवडून येणे ही त्यांची उपलब्धी असून त्यांच्या सारखे यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाला मनापासून स्वतःहून शुभेच्छा देणार्यांची संख्या जास्त असल्याचे सांगून त्यांनी वामनदादा यांना दिर्घआयुष्य लाभावे अशा
शुभेच्छा दिल्यात.
कुछ हुआ की नही – खडसे
एकनाथराव खडसे यांनी वामनदादा यांच्या बद्दल सांगतांना ते सरळमार्गी असल्याचे सांगितले. वामनदादा सोबतचे अनुभव सांगतांना खडसे म्हणाले की, एकदा दादा त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी नाथाभाऊंची आस्थेवाईकपणे चौकशी करत विचारले होते की, नाथाभाऊ तुम्हाला मंत्रीमंडळात घेणार की नाही याची विचारणा केली. हा प्रश्न गहन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसुतीगृहाबाहेरील नातेवाईंक डॉक्टरांना अस्वस्थपणे विचारातात की, डॉक्टर साहब कुछ हुआ की नही तशी परिस्थिती असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केल्याने सभागृहात हशा पिकला होता. वामनदादा सत्काराला उत्तर देतांना भावुक झाले.