‘वॉर’ बॉक्स ऑफिसवर हिट; १५० कोटींकडे वाटचाल !

0

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असणारा थ्रिलर चित्रपट ‘वॉर’ सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. कमाईचे आकडे पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगल्या वेगाने पुढे जात आहे. या चित्रपटाने चार दिवसांमध्ये १३० कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच १५० कोटींचा टप्पा पार होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आतापर्यंत पहिल्या चार दिवसांत इतकी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘वॉर’ने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. हृतिक आणि टायगर या दोघांच्याही करिअरमध्ये सर्वाधिक कमाईचा हा चित्रपट ठरू शकतो असे बोलले जात आहे.

काल या चित्रपटाच्या कमाईत २८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. आज रविवार सुट्टीच्या दिवशी पुन्हा मोठी वाढ होणार आहे.