मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज मंगळवारी प्रदर्शित झाला. 2 मिनिट 25 सेकंदाच्या ट्रेलर आहे. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट जबरदस्त अॅक्शनने भरलेला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आज ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. पण पुढे टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि सुरु होते ते ‘वॉर’. टायगर आपल्या गुरूच्याच विरोधात का जातो आणि या वॉरचा शेवट काय होतो, याविषयीची उत्सुकता या ट्रेलरमुळे आता ताणली गेली आहे.
हे देखील वाचा