भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला रवाना; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्वखर्चाने केली व्यवस्था

भुसावळ प्रतिनिधी दि 28 जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सदर गाडीची शिफारस केली होती. त्यानुसार भुसावळ येथून दि.२८ रोजी दु.०१.३० वा पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजुमामा) भोळे व आमदार संजय सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली.

सदर विशेष आषाढी रेल्वे गाडी उद्या दि.२९ रोजी सकाळी ३.३० वा. पंढरपूर येथे पोहोचणार तर उद्याच रात्री १०.३० वा पंढरपूर येथून परतीला निघणार असुन, दि.३० रोजी भुसावळ येथे परत येणार आहे.

 

सदर अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखचनि खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत असणार आहे, यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजुमामा) भोळे व आमदार संजय सावकारे यांनी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.