लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात वॉरंट

0

नवी दिल्ली – रेल्वे निविदा हॉटेल घोटळा प्रकरणात लालू प्रसाद, राबडी देवी आणि तेजस्वी यांच्यासह 16 जणांवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणी शुक्रवारी पटियाला हाऊस न्यायालयाने लालूविरोधात वॉरंट काढण्यात आले आहे. तसेच लालू यांना 6 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

30 जुलैला न्यायालयाने लालू, राबडी आणि तेजस्वी यांना समन्स दिले होते. 31 ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, शुक्रवारी राबडी आणि तेजस्वी दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयात हजर राहिले. राबडीदेवी आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादवसह 14 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सर्व आरोपींना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयाकडून लालू यादवसाठी प्रोडक्शन वारंटची मागणी केली होती. न्यायालयाने प्रोडक्शन वॉरंटची मागणी मान्य केली आहे. न्यायालयाने लालू यांना 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना रांचीहून दिल्लीत आणले जाईल.