ज्येष्ठ नागरिकांसाठी पाण्याची सोय 

भुसावळ l येथील  जय गणेश जेष्ठ नागरिक संघातर्फे कामगार दिना निमित्त जे जेष्ठ नागरिक बँकेत पेन्शन घेण्यासाठी उन्हात ताटकळत असतात, त्यांच्यासाठी पिण्याच्या थंड पाणी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानुसार सकाळीं 11.30वाजेपासून ते दुपारी 2वाजेपर्यंत स्टेट बँक मेन ब्रांच,युनियन बँक, सेंट्रल बँक, आणि स्टेट बँक मिनी ब्रांच, बँक ऑफ बरोडा या ठिकाणी थंड पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले. त्याबरोबर पेन्शनधारक नागरिक यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी ह्या उपक्रमासाठी संघाला धन्यवाद दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राजेंद्र बावस्कर अध्यक्ष,श्री. दिलीप तिडके सचिव,श्री. शांताराम बोबडे खजिनदार,श्री. दिनकर जावळे सर,श्री. गोपाळ वाणी,श्री. ललित कुमार भोळे,श्री. रामचंद्र बावस्कर,श्री. ज्ञानदेव इंगळे,शाळीग्राम पाचपांडे यांनी परिश्रम घेतले.