चाळीसगाव। गुजरातच्या अंबुजा एक्सपोर्ट कंपनीच्या दुषित पाणी व वायु प्रदूषणामुळे खडकी बु. परिसरात रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. यामुळे तातडीने ही समस्या मार्गी लावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जनआंदोलनने निवेदनाद्वारे दिला आहे.
एमआयडीसी परिसरातील गुजरातच्या अंबुजा एक्सपोर्ट कंपनीच्या दुषित पाणी व वायु प्रदूषणामुळे खडकी बु. परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच येथील स्थानिक कर्मचार्यांना कंपनीकडून आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. यामुळे तातडीने ही समस्या मार्गी लावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रा. गौतम निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
कंपनीचा मनमानी कारभार सुरू