भुसावळात वीर सावरकरांचा गैरपध्दतीने स्मारक उभारल्याने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, भुसावळ आमदार संजय सावकारे यांनी राजीनामा द्यावा

भुसावळ प्रतिनिधी l भुसावळकरांना अंधारात ठेवत प्रशासनाच्या मदतीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व आमदार संजय सावकारे यांनी जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्स समोर अनाधिकृतपणे चक्क डिव्हायडर वरती वीर सावकरांचे स्मारक रात्रीचे रात्री उभारून गिरीष महाजन यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. एक जबाबदार मंत्री व आमदार अशा पध्दतीने वीर सावरकरांचे स्मारक डिव्हायडरवर उभारल्यामुळे भुसावळ शहरात तीव्र संतापाची लाट निर्माण होत आहे. भुसावळ शहरामध्ये वीर सावरकरांसाठी प्रशासनाकडे पुरेशी जागा नाही का ? भारतीय जनता पार्टीची सत्ता असून भुसावळ शहरामध्ये वीर सावरकरांचे स्मारक अशा पध्दतीने उभे करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे आम्ही ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देत आहोत की, वीर सावरकरांच्या स्मारकासाठी भुसावळ शहरात योग्य रित्या जागा निवडून डिव्हायडरवरील स्मारक हटवून योग्य ठिकाणी करण्यात यावे. ठाकरे गटाची मागणी असून मंत्री गिरीष महाजन आणि आमदार संजय सावकारे यांनी अशा पध्दतीचे स्मारक उभारून सावरकरांचा अपमान केला असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाचे वतीने रस्ता रोको करत चक्का जाम करणार आहोत. असे निवेदन प्रशासनाला इशारा देत आहोत. त्याच बरोबर स्मारकाला ज्या ज्या अधिका-यांनी मान्यता दिली त्या त्या अधिका-यांना लिपीय निलंबित करण्यात यावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी भुसावळ, जळगांव जिल्हा अधिकारी, राज्यपाल, माजी मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर निलेश महाजन विधानसभा क्षेत्र प्रमुख , स्वप्नील सावळे उप शहर प्रमुख संतोष सोनवणे, राजेंद्र इंगळे, हेमंत खंबायत पिंटू भोई, रहीम गवळी व आदिच्या सह्या आहेत.