नवी दिल्ली: आज सुप्रीम कोर्टात विवादित रामजन्मभूमीचा निकाल लागला असून, न्यायलयाने मस्जिद साठी ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले आहे. यावर अस्सुद्दिन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अयोध्यामध्ये मस्जिदसाठी जमीन खरेदी करू शकतो, आम्हाला जमीन दान मध्ये नको असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही या निकालाने समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आम्ही आमच्या न्यायासाठी लढत होतो. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाला आव्हान देण्याचे त्यांनी संकेत दिले आहे. मुस्लीम समाजाने ५ एकर मिळालेली जमीन न घेण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. या निर्णयाने मथुरा, काशी चा विवाद भडकण्याची शक्यता वर्तवली आहे.