गुरुवायर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीए सरकारने सत्ता स्थापन केली आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.पंतप्रधान झाल्यानंतर आज मोदी पहिल्यांदाच पक्षाची जाहीर सभा घेत आहे. केरळमधील गुरुवायर येथे त्यांची प्रचारसभा सुरु आहे. यावेळी मोदींनी भाजपचे कार्यकर्ते केवळ निवडणुकीपुरता तळागाळापर्यंत जात नाहीत तर ३६५ दिवस जनतेची सेवा करतात, आम्ही केवळ राजकारण करण्यासाठी सत्तेत आलेलो नाही तर राष्ट्र उभारणीसाठी सत्तेत आलेलो आहोत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. आम्ही विजयी झालो नाही तर तुम्ही विजयी झाले आहात अशी ग्वाही मोदींनी यावेळी दिली.
केरळात व्यवसाय उद्योग वाढावे यासाठी सरकारने स्वतंत्र मच्छीमार मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे रोजगार वाढीसाठी मदत होणार आहे.