‘तुम्ही खूप त्रास सहन केला’; मोदींचा काश्मिरी पंडितांशी संवाद !

0

ह्यूस्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात दाखल झाले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज रविवार ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत काश्मिरी पंडितांशी संवाद साधला. आपण खूप त्रास सहन केला आहे. आता एकत्र येऊन नवीन काश्मीर बनविण्यासाठी प्रयत्न करू अशा शब्दात मोदींनी काश्मिरी पंडितांना आश्वासन दिले.

कलम ३७० रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मिरातून गेलेले काश्मिरी पंडित आता परत येत आहेत. काश्मिरात काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मोदींनी अमेरिकेत काश्मिरी पंडितांशी संवाद साधला.