| जळगाव प्रतिनिधी ।
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ग्रंथालय व ग्रंथपाल यांचे कार्य व संधी या विषयावर विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत केएकेषी महाविद्यालय, जळगांव यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणातील संधी या विषयावर झालेले हे पहिलेच वेबिनार उरले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागातील प्रो डॉ राजेंद्र कुंभार उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संयोजक प्रा हितेश ब्रिजवासी यांनी
असावा : डॉ. राजेंद्र कुंभार येवू घातलेल्या नवीन शैक्षणिक घोरणाच्या पार्श्वभूमीवर फक्त ग्रंथपालांना उपुक्त या वेबीनार घेण्यामागची भूमिका मांडली. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी शैक्षणिक क्षेत्रात a ग्रंथपाल आणि ग्रंथालय यांची गरज स्पष्ट करून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात हे दोन्ही घटक महत्वाचे आहे असे नमूद केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ राजेंद्र कुंभार यांनी नवीन शैक्षणिक धोरणात ग्रंथालय काय अपेक्षा दिली.