चिखली परिसरात आठवडे बाजाराचे उद्घाटन

0

नगरसेवक नेवाळे यांच्या वॉर्डमध्ये

निगडी : चिखली परिसरातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने जगदंब अ‍ॅग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतर्गत संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियानास नुकतीच सुरवात झाली. गजानन म्हेत्रे उद्यान, म्हेत्रेवाडी येथे पार पडलेल्या या अभियानाचे प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक संजय नेवाळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आता दर मंगळवारी दुपारी 3 ते 9 यावेळेमध्ये ग्राहकांसाठी बाजार खुले राहणार आहे.

नागरिकांची सोय होणार
नगरसेवक नेवाळे म्हणाले की, नागरिकांना चांगल्या प्रकारचा भाजीपाला, फळे मिळावीत तसेच अनेक बेरोजगार तरूणांना उत्पन्नाचा स्त्रोत सुरू होईल, या उद्देशानेच या आठवडे बाजाराची संकल्पना राबविली गेली. आपल्या परिसरातील अनेक बेरोजगार तरूण आहेत. त्यांना रोजगार मिळेल. या आठवडे बाजारातून परिसरातील नागरिकांना चांगल्या आणि दर्जेदार भाजीपाला उपलब्ध होईल. हा उपक्रम असाच चालू ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची भटकंती करण्याचा त्रास कमी होणार आहे. तर नगरसेवकांनी अत्यंत उपयुक्त असा आठवडे बाजार सुरू केला आहे. त्यांनी हा आठवडे बाजाराची संकल्पना संपूर्ण वॉर्डमध्ये राबवावी. असेच लोकोपयोगी उपक्रम राबविले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.