मुक्ताईनगर / प्रतिनिधी….
तालुक्यातील इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथील ज्ञान पूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप देखील करण्यात आली. याप्रसंगी कर्की विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन अनिल वाडीले हे अध्यक्षस्थानी होते.तर प्राचार्य बी डी बारी, ज्येष्ठ नागरिक गोविंदा चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका आशा कांडेलकर, सुधीर मेढे, बी के महाजन ,महेंद्र तायडे, गणेश पवार, प्रदीप पाटील, मीनल कोल्हे, बाळासाहेब देशमुख, प्राध्यापक मनोज भोई, अजिंक्य पाटील, विनोद पाटील, गोपाळ सपकाळ,बेबाबाई धाडे हे उपस्थित होते.