महावितरण’च्या विहिरीत सापडली मानवी कवटी, मांडीचे हाड

0

जळगाव :- शहरातील दिक्षीत वाडी येथील मराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालय आवारात 150 फूट जुन्या विहिरीत गाळ उपसत असताना मजुरांना मानवी कवटी व मांडीचे हाड आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास समोर आली.

दिक्षीतवाडी परिसरात महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या कार्यालय आवारात जुनी विहीर आहे. पाणि टंचाईचा काळ असल्याने या विहीरीतील गाळ आणि घाण उपसण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. गाळ उपसत असतांना सोमवारी अचानक कामगारांनी बाहेर काढलेल्या गाळात मानवी कवटी आणि एक मोठे हाड निघाले. घटनेची माहिती तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना कळविल्यावर प्रभारी अधिकारी संदिप अराक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर दाखल झाले. कामगारांना आणखी गाळ उपसण्यास सांगुन इतर काही पुरावे मिळतात काय याचा शोध घेतला मात्र उशिरा पर्यंत केवळ कवटी आणि एक हाड याच्या व्यतिरीक्त काही मिळाले. नाही. कार्यालयातील उपव्यवस्थापक चेतन जगन्नाथ तायडे यांनी खबर दिल्यावरुन जिल्हा पेठ पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक

मनोज वाघमारे करीत आहेत.