पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ करण्याबाबत मोदींचे आश्वासन: ममता बॅनर्जी

0

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील कटुता सर्वश्रुत आहेत. मात्र आज ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्या होत्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांगला’ करण्याबाबत चर्चा झाली. यावर पंतप्रधान मोदी सकारात्मक असून त्यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बंगला’ करण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

आज ममता बॅनर्जी मोदींच्या भेटीला जात असताना विमानतळावर मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांच्याशी भेट झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी जसोदाबेन यांना साडी भेट देत चर्चा केली.