कोलकाता-पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाला. या स्फोटात पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून इतर ५ जण जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचा करण्यात येत आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास हा स्फोट झाला.