लाचखोरीत बडे अधिकारी आघाडीवर
नाशिक ( प्रतिनिधी )
शासकिय गाडी, नोकरचाकरांचा राबता, गळेलठ्ठ पगार,एवढे कमी पडते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.नाशिक जिल्ह्यातील अनेक बड्या लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली असून आता दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या हाती लागला आहे.
या लाचखोरीची हकीगत अशी एका खासगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी निलेश अपारने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली . याबाबतची एसीबीला माहिती मिळताच एसीबीने सापळा रचून अपार याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले .
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून त्यांनी भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल 130 आरोपींना जेरबंद केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकरून कारवाया सुरू आहे, तरी देखील लाचखोर पैसै खाण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.खरे तर हे लाचखोर कुणामुळे असे धाडस करतात?हे तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे.