मुंबई : कोकणातील रत्नागिरी-राजापूर भागात कातळ शिल्प आढळतात. कोकणातील जांभ्या दगडावर ही कातळ शिल्प कोरलेली आहेत. प्राण्याची चित्र, मानवी आकृती, विविध भौमितिक आकार या खडकाळ भागावर आढळतात. थोडक्यात काय तर दगडावर कोरलेली चित्रं मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात.
या कातळ शिल्पांमध्ये विविध आकार आढळतात. एक मोठा हत्ती अन् त्याच्या पोटात विविध प्राणी. हे चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिवाय गेंडा, पाणघोडा याचीही चित्र आढळतात.
कोकणात आढळणारी कातळ शिल्प जवळपास 45 हजार वर्षे जुनी असल्याचं बोललं जातं. जेव्हा गटागटाने राहणारा मानव स्थैर्याकडे वाटचाल करू लागला तेव्हाची ही कातळ शिल्प असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी मानव कसा राहत होता? तो कसा जीवन जगायचा? या सगळ्याचा उलगडा ही कातळ शिल्प करू शकतात. कातळ शिल्पांना पाहून मनात उपस्थित होणारे अनेक प्रश्नच आपल्याला इतिहासाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.
जेव्हापासून हा प्रकल्प कोकणात होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच त्याच्या परिणामांबाबत संशोधन केलं जात आहे. रिफायनरीचा परिणाम कातळ शिल्पांवर होणार की नाही? याबाबत देखील चर्चो होत आहे. कातळ शिल्पांवर या प्रकल्पाचा काय परिणाम होणार आहे? हे स्पष्ट झाल्या शिवाय या प्रकल्पाचं कामकाज पुढे नेऊ नये, असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे.