सॅम पित्रोदा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मी जाहीर माफी मागतो: राहुल गांधी

0

फतेहबाद साहिब: कॉंग्रसने नेते शास्त्रज्ञ सॅम पित्रोदा यांनी १९८४ शीखविरोधी दंगलीप्रकरणी वादग्रस्त विधान केले होते. यावरून कॉंग्रेसवर टीका होत आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे. आता पुन्हा राहुल गांधी यांनी पित्रोदा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो असे सांगितले. पंजाबमधील फतेहबाद साहेबा येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

शीख विरोधी विधान केल्याने शीख समाजात कॉंग्रेसविषयी नाराजी निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेस सरकार आहे, त्यामुळे कॉंग्रेसने अधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यातच पित्रोदा यांच्या या विधानामुळे नाराजी पसरू नये यासाठी स्वत: राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे.