प्रवाशाच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

0

नागपूर :– गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा भीषण अपघात होताना टळला. नागपूरजवळील कलमेश्वर येथे गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस आली असता अचानक गाडीच्या एका डब्याखालून मोठा आवाज एकू येत असल्याचे समजताच प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.