जेंव्हा शरद पवार अडकतात

0

सातारा: शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र दरवाजा पूर्णत: लॉक झाल्यामुळे पवारांना ताटकळत उभे राहावे लागले. अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडतच नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्न केल्यानंतरही दरवाजा उघडत नव्हता त्यामुळे अखेर दरवाजा तोडण्यात आला.