कॉंग्रेस सत्तेत आल्यावर १० दिवसात कर्जमाफी देऊ

0

बंगळूर- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकातील जनतेला एका पाठोपाठ एक जाहीर सभा घेऊन संबोधीत करीत आहे. शुक्रवारी कलगी येथील जाहीर सभेत राहुल गांधी अधिकच आक्रमक होते. भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोडी, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येदियुरप्पा आदींवर त्यांनी कडाडून टीका केली. भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावर त्यांनी भाजपला लक्ष केले.

जनतेला आठवण असेल अमित शहा यांनी येदुयुरप्पा यांना सर्वाधिक भ्रष्ट्र मुख्यमंत्री म्हणून संबोधले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. मोदी सत्तेत आल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. पंतप्रधान यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश दिला मात्र बेटी भाजपच्या आमदारांपासून वाचविण्याची गरज असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कॉंग्रेस सरकारने कर्नाटकातील शेतकऱ्यांचे 8 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आहे. मोदी यांनी एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही. २०१९ मध्ये कॉंग्रेस सत्तेत आल्यास दहा दिवसात देशातील शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिला.