कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला तेंव्हाच लोकशाहीची हत्या झाली-अमित शहा

0

बंगळूर-कर्नाटकात निकालाच्या दिवशी काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केली तेव्हाच लोकशाहीची हत्या झाली असा ट्विट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. कर्नाटकात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या पक्षाचा इतिहास नक्कीच माहित नसेल किंवा आठवत नसेल. देशावर आणीबाणी लादणारा, कलम ३५६ चा गैरवापर करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

कर्नाटकात १०४ जागा मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशात जेडीएस या ३७ जागा मिळवणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत काँग्रेसने त्यांच्यासोबत हातमिळवणी केली त्याच दिवशी लोकशाहीची हत्या झाली असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी भाजपाबाबत जे ट्विट केले होते त्या ट्विटला अमित शाह यांनी असे उत्तर दिले आहे.