हरिभाऊ सोनवणे
नाशिक ( प्रतिनिधी )
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर या नेहमी सभेतेच्या गप्पा मारत होत्या.त्यांची नोकरीची सुरुवात अनुकंपा नोकरीपासून सुरु झाली. जुन्या आठवणी रंगवून सांगताना आपण भ्ष्टाचार करतो हे त्या जाणून बुजून विसरत होत्या.परंतु खोटारडे पणाचा अंत एक दिवस होतोच. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने त्यांची संपूर्ण कारकीर्द उजलून निघाली.
सुनीता धनगर या सटाण्याच्या. त्यांचे शिक्षण सटाणामध्ये झाले. लग्नानंतर त्या ठाणे येथे स्थायिक झाल्या. त्यांनी बीएडची पदवी संपादित केली. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. सोबत लहान मुलगा होता. पती शासकीय नोकरीत असल्याने त्यांना अनुकंपाखाली नोकरी मिळाली. जिल्हा परिषदेच्या ठाणे येथील शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. सोबत लहान बाळ असल्याने नोकरी व बाळाचे पालनपोषण करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ नाशिक जिल्ह्यात बदली घेतली.
अनुकंपा नोकरदार ते मनपाच्या शिक्षणाधिकारी; लाचखोर सुनीता धनगरांचा असा प्रवास आहे.
नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयात त्या शिक्षिका झाल्या. दरम्यान त्यांनी एमएची पदवी संपादित केली. 1994 ते 2010 या कालावधीत त्या इयत्ता 10 वीला इंग्रजी विषय शिकवित असत. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. सरळ सेवेने त्या विस्तार अधिकारी झाल्या. कालांतराने उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली. त्या चांदवड येथे विस्तार अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी तर देवळा येथे गटशिक्षणाधिकारी होत्या. भल्याभल्यांना नाशिक मनपात नोकरी करण्याचा मोह होतो. धनगर यांनाही मनपात नोकरी करण्याची संधी मिळाली.
दोन वर्षापासून त्या नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहे.मनपात त्यांना लाचखोरीची लागन झाली.
त्यांच्याशी चर्चा करतांना नेहमीच आपण किती सभ्य आहोत .यावर त्या भाषणच द्यायच्या. या महिला अधिकाऱ्याच्या घरात 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने एवढी संपती सापडल्याचे पाहून डोक सुन्न होते, एवढी हाव कशासाठी? आपण अनुकंपावर काम करीत आहे, हेच त्या विसरल्या. भ्रष्टाचराचा भस्म्या झाल्यागत त्या नोटाच पाहू लागल्या आणि अती झाल्यानंतर त्याचा सभ्यतेचा बुरखा टराटरा फाटला हेच अंतिम सत्य उरले.