कोलकाता: लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाना साधला होता. भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील वाकयुद्ध थांबायचे नाव घेत नसून पुन्हा एकदा ममता यांनी भाजपावर निशाना साधला आहे. भाजपा हा गुंडाचा पक्ष असून, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला असा प्रश्न त्यांनी आज कोलकाता येथील सभेत उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदा कोलकाता येथील जाहीर सभेत ममता बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपावर टीका करत भाजपा हा गुंडाचा पक्ष असल्याची टीका केली. भाजपाने डाव्या पक्षांना आपले लक्ष बनवले आहे, त्या पक्षातील अनेक नेते भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी इव्हीएम मशिन वरून भाजपावर निशाना साधला आहे. भाजपाने आपल्या मतदारसंघात बैलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात त्यात त्यांचा पराभव करून दाखवेल असे म्हटले आहे. ममता यांच्या आजच्या सभेला भाजपा काय उत्तर देते हे पाहणे आता औस्त्युक्याचे ठरेल.