मुंबई : भारतातील सर्वात लांब रूटची ट्रेन कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?तर विवेक एक्सप्रेस नावाची ही ट्रेन सर्वात लांब आहे. विवेक एक्सप्रेस नंतर कोणत्या ट्रेनचा रुट सर्वात मोठा आहे? तर भारताच्या एका कोपऱ्यातून (काश्मीर) दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत (कन्याकुमारी) जाणारी ट्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती ट्रेन ट्रॅकवर सुमारे ८० तास सतत धावते तर एका बाजूने सुमारे ३००० किलोमीटर प्रवास करते.
हिमसागर एक्सप्रेस जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारीपर्यंत धावते. ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन आहे आणि सध्या अंतर आणि वेळेच्या दृष्टीने सर्वात लांब धावणारी दुसरी आहे. देशातील १२ राज्यांमधून जाणारी ही एकमेव ट्रेन आहे. याची सुरुवात १९८४ मध्ये झाली. त्यावेळी ही देशातील सर्वात लांब ट्रेन होती.
राज्यांमधून जाणारी हिमसागर एक्स्प्रेस ७१ तास ५० मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करते. या दरम्यान ती एकूण ७० स्टेशनवर थांबते. यामध्ये दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांच्या प्रमुख रेल्वे जंक्शन्सचा समावेश आहे. म्हणूनच या ट्रेनमध्ये प्रवास करून तुम्ही भारताचा बहुतांश भाग पाहू शकता. काश्मीर ते कन्याकुमारी जाण्यासाठी हिमसागर एक्स्प्रेसला चार दिवसांचा लांबचा प्रवास करावा लागतो.