जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, वाघ नगर, जळगांव येथील पूर्व प्राथमिक विभागात बुधवारी पांढरा रंग दिवस साजरा करण्यात आला. माधुरी नाईक यांनी मुलांना पांढऱ्या रंगाची ओळख करून दिली. तसेच पांढऱ्या रंगाच्या वस्तुंची आकर्षक मांडणी शुभांगी राहूल चौधरी यांनी केली.
वस्तुंमधे खेळणी, धान्य, फुले ,कापड, कापूस यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील व समन्वयिका.जयश्री यांचे मार्गदर्शन लाभले.